सर्वांचे या शैक्षणिक ब्लाॅगवर हार्दिक स्वागत आहे this blog is under construction

Wednesday 30 December 2015



विषय : ज्ञानरचनावाद
     आज वाई तालुक्याचे नाव  ज्ञानरचनावादी अध्यापनाच्याबाबत महाराष्ट्रभर चर्चिले जात आहे.
इथे विद्यार्थ्याना  शिकवले जात नाही तर विद्यार्थी स्वतःच त्याच्या पूर्व ज्ञानाच्या आधारे  शिकतात.
त्यांना फक्त अध्ययनास पोषक वातावरण  वर्गात तयार केले जाते.
वर्गात रचनावादी अध्ययनासाठी विविध अध्ययन अनुभव महत्वाचे  असतात विद्यार्थ्याना सतत कृतिशील
ठेवावे लागते त्या साठी विविध शैक्षणिक साहित्याच्या आधारे विद्यार्थ्यांना घटक शिकण्यास मदत केली जाते.
या अध्यापन प्रणालीचा वापर केल्याने विद्यार्थ्याच्या बौद्धिक दर्जात लक्षणीय वाढ झाली आहे . इयत्ता
पहिलीतील विद्यार्थी दहा अंकी संख्या लिहितात व वाचतात.कोर्या संख्या तक्त्यात कोणत्याही संख्याचे
स्थान दाखवतात. बेरीज वजाबाकी प्रात्यक्षिकाद्वारे करतात. जोड शब्दामधील रफार , व र चे
सर्व जोड शब्द वाचतात  आणि लिहायचे कसे हे वर्णन करतात. इयत्ता दुसरीतील विद्यार्थी दिलेल्या
शब्दाच्या आधारे कविता आणि गोष्टी तयार करतात. या सर्वच्या पाठीमागे शिक्षकांनी सकारात्मक दृष्टीकोन
ठेवून राबवलेला रचनावाद  होय.
 आणि अश्या प्रकारे रचनावाद कसा राबवावा हे  आपणासमोर  या ब्लॉगद्वारे मांडत आहोत. या  ब्लॉगमध्ये
 आपल्याला प्रत्येक घटक कसा शिकवावा यासाठी लागणारे  वेगवेगळे साहित्य, अध्ययन अनुभव पुरवत आहोत.
 १) ज्ञानरचनावादावरील विडीओज
२) ज्ञानरचनावादावरील शैक्षणिक साहित्य
३) फरशीवर विविध अध्ययन पूरक रंगरंगोटी
४) ज्ञानरचनावादी पाठाचे डेमो
५) रचनावादी अध्यापनासाठी संदर्भ साहित्य
६) वर्गरचना
७) रचनावादावरील  पी पी टी
८) कविता
९) शैक्षणिक अप्स
१०) सायंटिफिक व्हिडीओज
   या सारख्या अनेक उपयुक्त साहित्यासाठी login करा ...............
   waieducation.blogspot.com